राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्याबाबत राज्य शासनांकडून अत्यंत मोठी सकारात्मक बातमी समोर आलेली आहे .
राज्य कर्मचाऱ्यांचा दि.14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये जुनी पेन्शनसह इतरही मागणीकरीता संप करण्यात आला होता . या मागणीपत्रामध्ये जुनी पेन्शन नंतर सर्वात जास्त मागणी करण्यात आलेली मागणी म्हणजे केंद्र सरकार व इतर 25 राज्य सरकार प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावेत .
गुरुवारी अधिकारी महासंघाची मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सेवानिृत्तीचे वय केंद्र सरकारप्रमाणे 60 वर्षे करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून , ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून , यावेळी महासंघाचे संस्थापक व.दि.कुलथे , अध्यक्ष विनोद देसाई त्याचबरोबर सरचिटणीस समीस भाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .
सेवानिवृत्तीच वय 60 वर्षे करण्याबाबतच पदोन्नती , सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा केंद्र सरकार प्रमाणे 20 लाख करणे तसेच 80 वर्षे पेक्षा अधिक वयाच्या वरिष्ठ निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे निवृत्तीवेतन वाढ देणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली .