@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers will have a 100-mark exam; only teachers who score 50% marks will get the benefit of senior/selection pay scale! ] : शिक्षकांची आता 100 गुणांची परीक्षा होणार आहे , या परीक्षेमध्ये ज्या शिक्षकांना 50 टक्के गुण प्राप्त झाले आहेत , अशा शिक्षकांनाच वरिष्ठ / निवड श्रेणीचा लाभ दिला जाणार आहे , याबाबतची अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
ज्या शिक्षकांचे सेवेत रुजु होवून 12 / 24 वर्षे पुर्ण झाले आहेत , अशा शिक्षकांचे वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी करीता प्रशिक्षण सुरु आहे . सदरचे प्रशिक्षण पुर्ण झाल्याच्या नंतर राज्य शैक्षणिक संशाधन व प्रशिक्षण परिषद मार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत .
सदरच्या प्रमाणपत्र प्राप्ती नंतर शिक्षकांना वरिष्ठ / निवड वेतनश्रेणीचा लाभ लागु केला जाणार आहे . परंतु यावेळी प्रशिक्षण पुर्ण झाल्याच्या नंतर 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे . या परीक्षेमध्ये शिक्षकांना 50 टक्के गुण घ्यावे लागणार आहे .
ज्या शिक्षकांना 50 टक्के गुण प्राप्त झाले नाहीत , अशा शिक्षकांना वरिष्ठ / निवड श्रेणीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहेत. प्रशिक्षणाच्या 32 सत्रांची एकत्रित 100 गुणांची परीक्षेची लिंक शिक्षकांना पाठविण्यात येणार आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण GR निर्गमित दि.11.06.2025
सदर प्रशिक्षण करीता ज्या शिक्षकांनी नियमित प्रशिक्षण पुर्ण केले आहेत , अशा शिक्षकांनाच सदर प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहेत , गैरहजर राहिलेल्या शिक्षकांची दिवाळीमध्ये पुन्हा एकदा प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !