Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Teaching & Non Teaching Employee Recruitment Adhisudhana related Shasan Nirnay ] : मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरुन शासन परिपत्रक , दिनांक 01 डिसेंबर 2022 नुसार दिलेली स्थगिती रद्द करुन त्या अनुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपद्धती बाबत सूचना निर्गमित करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील खाजगी शाळांमधील शिक्षकांचे विना अनुदानित तसेच अशंत : अनुदानित वरुन अनुदानित किंवा अंशत : अनुदानित पदांवर बदली करण्याबाबत अधिसूचना दिनांक 08.06.2020 मधील नियमांनुसार तसेच शासन निर्णय दिनांक 01 एप्रिल 2021यास शासन परिपत्रक दिनांक 01 डिसेंबर 2022 नुसार दिलेली स्थगिती उठविण्यात येत आहे . त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे सूचित करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , शा.परिपत्रक दिनांक 01 डिसेंबर 2022 च्या विरोधात दाखल रिट याचिका प्रकरणी मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्या संदर्भात शासन अधिसूचना , दिनांक 08 जुन 2020 व शासन निर्णय दिनांक 01 एप्रिल 2021 मधील तरतुदीप्रमाणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरुन सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर राज्यातील विना अनुदानित अथवा अशंत : अनुदानित वरुन अनुदानित / अंशत : अनुदानित पदावर बदली या संदर्भात उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यांमध्ये मा.न्यायालयाने आदेश पारित केलेले नाहीत , आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावीत , असे सूचित करण्याात आलेले आहेत .
व सदर वरील नियमांनुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर सदर नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशांपर्यंत शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.