या बँका वैयक्तिक कर्जावर लावत आहेत सर्वात कमी व्याजदर ! पहा विविध बँकांचे व्याजदर !

Spread the love

वैयक्तिक कर्जाचा लाभ घेण्याकरिता सर्वात प्रथम आपल्याला आपली पात्रता दर्शवावी लागते. त्यामध्ये तुमचे जॉब कार्ड आहे का नाही हे महत्त्वाचे नसते तर तुमचे प्रति महिना उत्पादन हे कमीत कमी पंधरा हजार रुपये असावे अशावेळी तुम्ही पात्र ठरत असता…

तुम्हाला माहित आहे का? पर्सनल लोन वर बँका जास्त व्याज आकारतात. त्यामुळे अनेक नागरिक पर्सनल लोन वर कोणत्या बँका कमी व्याज लावतात. आशा बँका नागरिक शोधत असतात. मित्रांनो जर तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा लाभ घ्यावयाचा असेल तर आजच्या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट बँका बद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. त्या माध्यमातून तुम्हाला कमी व्याजदरामध्ये जास्त कर्ज उपलब्ध करून घेत आहे. तेही सुरक्षित रित्या.

या बँका देत आहेत कमी व्याजाने कर्ज !

वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता विविध बँकेचे व्याजदर हे वेगवेगळ्या प्रकारात मोडतात. आयडीबीआय बँक ही बँक नागरिकांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते आणि यावर 8.15% ते 14 टक्के पर्यंत व्याजदर लावते. जवळपास 12 ते 60 महिन्यांसाठी ही बँक पंचवीस हजार रुपयांपासून पाच लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. अशावेळी जर स्टेट बँकेकडे आपण वळलो तर वैयक्तिक कर्जासाठी ही बँक नागरिकांना 9.6% जास्तीत जास्त 15.65% पर्यंत व्याजदर आकारते. सहा महिन्यापासून बहात्तर महिन्यांपर्यंत ही बँक नागरिकांना कमीत कमी 25 हजार ते जास्तीत जास्त वीस लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते.

युनियन बँक आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या कर्जावर कमीत कमी 8.90% व जास्तीत जास्त 13% व्याजदर आकारते. साठ महिन्याच्या कालावधी करिता पाच ते पंधरा लाख रुपयापर्यंत चा रकमेवर हे व्याजदर आकारले जाते. पंजाब नॅशनल बँक ही आपल्या ग्राहकांसाठी दहा लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. तर या रकमेवर 8.90% व्याजदर ही बँक आकार देते. तसेच पुढे इंडियन बँक 50000 पासून पाच लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते यावर 9% ते 13 टक्के व्याजदर आकारते.

पंजाब सिंध बँक आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक लाख ते तीन लाख रुपये पर्यंत नऊ ते अकरा टक्के व्याजदर वर साठ महिन्याच्या कालावधी करिता कर्ज उपलब्ध करून देते. दुसरीकडे बघायचे झाले तर बॅक ऑफ बडोदा ही बँक आपल्या ग्राहकांसाठी 48 ते 60 महिन्याच्या कालावधी करिता पन्नास हजार ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. या रकमेवर नऊ ते पंधरा टक्के पर्यंत व्याजदर आकारला जातो.

वैयक्तिक कर्जासाठी पात्रता काय आहे ?

वैयक्तिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी आपली पात्रता बँकेपुढे दर्शवावी लागते. विविध बँकाची आवश्यकता आहे. ज्या त्या बँकेनुसार वेगवेगळी असते अशावेळी तुमच्या क्रेडिट स्कोर ची भूमिका देखील त्यामध्ये महत्त्वाचे आहे कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी जे नागरिक अर्ज करून येणार असतील त्यांचे वय किमान 21 वर्षे व जास्तीत जास्त साठ वर्षे असावे आणि ज्यांनी सध्या सुरू असलेल्या नियुक्त सोबत कमीत कमी एक ते दोन वर्षापर्यंत काम पूर्ण केलेले असावे

Leave a Comment