by marathi pepar ,प्रतिनिधी : राहुल पवार : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा.के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्याची राजधानी असणारी ठिकाण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने 125 फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहेत .
भारत देशाच्या संविधानाचे जनक , तसेच जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटनेचे शिल्पकार असणारे डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2023 रोजी 132 वी जयंती देशांमध्ये नव्हे तर संपुर्ण जगांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेली आहे .तेलंगणा राज्य सरकारने डॉ.बाबासाहेबांचे विचार ,समाजांमध्ये रुजावे याकरीता हैद्राबाद येथे भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहेत .
पुतळ्यास हेलिकॉप्टरमधून पुष्प टाकून आदरांजली वाहण्यात आली तर या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेबांचे नातु तथा महाराष्ट्र राज्यातील वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष श्री.प्रकाश आंबेडकर उपस्थित होते .सदरचा भव्य 125 फुटी पुतळा हा तेलंगणा राज्य सचिवालयाच्या शेजारी स्थित आहे .
डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या अनावरणावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी बोलताना सांगितले कि , दलिब बांधवाच्या उन्नतीसाठी दलित बंधू योजना राबविण्यात येतील .या योजनेच्या माध्यमातुन दलित बांधवांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपये शंभर टक्के अनुदानातुन देण्यात येणार आहेत .