खुशखबर : राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2023 पासून फरकासह वाढीव मानधन लागु !

Spread the love

मराठी पेपर टीम , प्रतिनिधी राहुल : राज्य शासन सेवेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागु करण्यात आलेले आहेत . सदर वाढीव मानधननुसार राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागु करण्यात आलेले आहेत . परंतु अद्याप पर्यंत राज्यातील अनुदानित शाळा मधील कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागु करण्यात आलेले नव्हते . यामुळे प्रशासनांकडून सदर अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि.07.02.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 100 टक्के अनुदानित माध्यमिक शाळा व क.म.विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागु करणेबाबत वेतन अधिक्षक कार्यालय गडचिरोली यांच्या कडून दि.17.04.2023 रोजी महत्वपुर्ण पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदर पत्रकानुसार खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर सेवक यांचे मानधन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि.07.02.2023 रोजीच्या निर्णयानुसार , दि.01 जानेवारी 2023 पासून मानधन वाढ करण्यात आलेली आहे .यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक यांना आदेशित करण्यात आले आहेत कि शिक्षण सेवक / शिक्षकेत्तर सेवक यांचे मानधनात वाढ करुन शालार्थ प्रणालीमध्ये , चेंज डिटेल्स मध्ये चेंज करुन कार्यालयाचे लॉगीनवर फॉरवउर् करुण्यात आवे .

त्याचबरोबर चेंज डिटेल्सचा प्रस्ताव कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .यामध्ये शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वाढीव मानधन पुढील प्रमाणे आहेत .

शिक्षण सेवक ( शिक्षक ) वाढीव मानधन

अ.क्रपदनामवाढीव मानधन
01.प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवक16,000/-
02.माध्यमिक शिक्षण सेवक18,000/-
03.उच्च माध्यमिक व क.म.शिक्षण सेवक20,000/-

शिक्षकेत्तर कर्मचारी वाढीव मानधन –

अ.क्रपदनामवाढीव मानधन
01.ग्रंथपाल14,000/-
02.प्रयोगशाळा सहाय्यक12,000/-
03.कनिष्ठ लिपिक10,000/-
04.चतुर्थ श्रेणी कर्मचारी ( यामध्ये केवळ अनुकंपावर नियुक्त कर्मचारी )8,000/-

वरील नमुद वाढीव मानधनांप्रमाणे माहे एप्रिल 2023 चे नियमित ऑनलाईन वेतन देयकामध्ये , माहे मार्च 2023 च्या फरकासह सुधारित दराने मानधन काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर माहे जानेवारी व फेब्रुवारी 2023 चे फरकाचे ऑफलाईन देयक एमटीआर – 151 सोबत दिनांक एप्रिल ते 25 एप्रिल 2023 या मधील कार्यालयीन कालावधीत वेतन पथक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक गडचिरोली यांनी दिले आहेत .

Leave a Comment