मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार आहे , ती म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .या संदर्भात कर्मचारी संघटनांनी राज्य शासनांस निवेदने दिल्याने , राज्य शासनांकडून यावर लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे .
मिडिया रिपोर्ट नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ दि.01 मे 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री कामगार दिनांच्या दिवशी जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात होती . परंतु मुख्यमंत्री यांनी कामगार दिनांच्या दिवशी कोणतीही घोषणा न केल्याने , राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसून येत आहे .
हे पण वाचा : सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करणे हा देखील जुनी पेन्शनला पर्यायी उपाय !
डी.ए वाढीचा प्रस्ताव वित्त विभागांकडून तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे , या प्रस्तावांमध्ये राज्य शासन सेवेतील कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ महागाई भत्ता फरकासह लागु करण्यात यावा असे नमुद आहे .या प्रस्तावास राज्य शासनांकडून लवकरच मान्यता देण्यात येणार आहे .
सदर वाढीव महागाई भत्ताच्या प्रस्तावास राज्य शासनांकडुन लवकरच मान्यता देण्यात येवून पुढील महिन्यांपासून वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्याची मोठी शक्यता आहे . सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 38 टक्के प्रमाणे डी.ए अनुज्ञेय आहे , यांमध्ये आणखीण चार टक्के वाढ झाल्यास एकुण डी.ए हा 42% होईल .
शासकीय कर्मचारी विषयक / शासकीय योजना /नोकर भरती अपडेट करीता Whatsapp ग्रुप जॉईन करावे .