अभ्यास समितीसमोर सेवानिवृत्तीचे वय वाढविणे हा देखिल जुनी पेन्शनला पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

मराठी पेपर ,राहुल पवार प्रतिनिधी : सध्या राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात अभ्यास समितीसमोर विविध उपाय सुचविण्यात येत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांची जुनीच पेन्शन लागु करा , अन्यथा पुन्हा संप करु असा इशारा राज्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत .यामुळे अभ्यास समितीसमोर अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत . यांमध्ये तज्ञांकडून सेवानिवृत्तीचे वय वाढविणे हा देखिल पर्याय सुचविण्यात आलेला आहे .

राज्य सरकारने गठित केलेल्या अभ्यास समिती समोर केवळ जुनी पेनश व राष्ट्रीय पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेंप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान होईल अशा पद्धतीने पेन्शन योजना लागु करणे हा उद्देश आहे .

हे पण वाचा : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळत आहे सर्वात जास्त परतावा !

सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास कसा होईल फायदा – सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवावे असे तज्ञांचे मत आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अधिक काळ सेवेत रहावे लागणार आहे . यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेन्शन खर्चांमध्ये चक्क 20 टक्के घट होईल .

परंतु सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ केल्यास , निश्चितच बेरोजगारींमध्ये वाढ होणार आहे , याउलट सध्या राज्य शासन सेवेत तब्बल 2.50 पदे रिक्त असून देखिल सद्यस्थितीत अतिरिक्त कामाचा बोझा अंगावर घेवून शासकीय कर्मचारी काम करत आहेत . बऱ्यांच अधिकारी / कर्मचाचारी यांच्याकडे रिक्त पदांमुळे अतिरिक्त कामाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे .

शासकीय कर्मचारी विषयक / शासकीय योजना /नोकर भरती अपडेट करीता Whatsapp ग्रुप जॉईन करावे .

Leave a Comment