Business Loan : तरुण उद्योजक मित्रांना व्यवसाय सुरू करण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काम करत असते. या माध्यमातून तरुण वर्गाला व्यवसाय सुरू करण्याकरिता जे तरुण उद्योजक कर्ज घेतात त्यांच्या कर्जावरील व्याजदर हा कमी करून परत केला जातो.
Apply For Loan Annasaheb Patil Yojna :
विविध शेती पूरक व्यवसाय करायचे असतील किंवा लघुउद्योग छोटे मोठे व्यवसाय करायचे असतील याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कर्जाची उपलब्धता करता येते.
ज्या कोणी पात्र महिला असतील त्यांच्या करिता गृह उद्योग सुरू करण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत बँकेच्या माध्यमातून जे कर्ज मिळते त्या कर्जावरील व्याज हे पूर्णपणे माफ केले जाते. प्रामुख्याने या कर्जाचे तीन प्रकार पडतात.
त्यामध्ये पहिला प्रकार आहे वैयक्तिक कर्ज परतावा योजना, यामध्ये दुसरा प्रकार आहे गट कर्ज व्याज परतावा आणि शेवटचा प्रकार आहे गट प्रकल्प कर्ज परतावा योजना.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे;
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे असतील.
सर्वात प्रथम कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज करत असताना उमेदवाराचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, या सोबतच उमेदवाराच्या जातीचा व उत्पन्नाचा दाखला, उमेदवारच्या प्रकल्पाचा अर्ज उद्योगचे आधार प्रमाणीकरण, इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करत असताना लागणार आहेत ही कागदपत्रे आपण ऑनलाईन पद्धतीने अपलोड करू शकतो.
Apply For Loan Annasaheb Patil Yojna
मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर या अगोदर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा…
जे कोणी पुरुष असतील त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही पन्नास वर्षे निश्चित केली आहे व महिलांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 55 पर्यंत निश्चित केली आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुमचे उत्पन्न जास्तीत जास्त आठ लाखापर्यंत असावे.
पाच वर्षाच्या कालावधी करिता कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता.
कर्ज मर्यादेची रक्कम ही 15 लाखापर्यंत असणार आहे. यासोबतच याचा व्याजदर हा दर साल दर शेकडा मागे 12 टक्के इतका असेल यासोबत जास्तीत जास्त तीन लाख रुपये पर्यंत व्याज रकमेच्या परतावा या योजनेच्या माध्यमातून करता येईल.
जे कोणी लाभार्थी व्यक्ती असतील त्यांनी योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतल्यानंतर जो काही व्यवसाय सुरू करतील त्या व्यवसायाचे दोन फोटो सहा महिन्याच्या आत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करावे हे आवश्यक आहे.
योजनेच्या माध्यमातून जे कर्ज घेणार आहेत त्या उमेदवारांनी आपला व्यवसाय कर्ज घेऊन उभा केल्यानंतर व्यवसायाच्या पुढे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असा एक मोठ्या नावाने ठळक अक्षरात बोर्ड लावावा.