संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे 07 दिवसांचे वेतन अदा करणे संदर्भात कोषागार कार्यालयाकडून , महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Spread the love

संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची सात दिवसांचे वेतन अदा करणे संदर्भात कोषागार कार्यालय सोलापूर मार्फत , दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे .

दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या संप कालावधीतील सात दिवसांचा कालावधीबाबत सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक संघटना 1522 प्रकरण 36/ 16 अ दिनांक 28 मार्च 2023 नुसार संपामध्ये जे कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होते , त्यांची गैरजहर कालावधीमधील सेवा ही खंड न समजता , “असाधारण रजा” म्हणून नियमित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

सदर माहे मार्च 2023 चे वेतन अदा करणे बाबत संप कालावधीतील सात दिवसांचे संपामध्ये सहभागी कर्मचारी यांचे बाबत पूर्णतः वेतन अदा करण्यात येत असून , उपरोक्त नमूद दिनांक 28 मार्च 2023 चे शासन निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित शासन आदेश निर्गमित न झाल्यास ,सदर संप कालावधीतील सात दिवसांचे वेतन हे विना वेतन म्हणून , माहे एप्रिल 2023 च्या वेतनातून एकरकमी कपात करण्यात येईल , याची कर्मचाऱ्यांना नोंद घेण्याचे आदेश सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील जिल्हा कोषागार कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता .

Leave a Comment