इ. 8 वि ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता मोफत सायकल ! प्रशासनाचा नवीन निर्णय जाहीर ! सविस्तर GR पाहा !

Spread the love

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांमधील 125 इतक्या जास्ती मागास तालुक्यामधील जे विद्यार्थी आठवी ते बारावी पर्यंत शिकत आहेत अशा मुलींना अगदी मोफतपणे सायकलचे वाटप केले जाईल. याबद्दल आता महत्त्वाचा शासन निर्णय 2022 मध्ये जाहीर केला होता.

या निर्णयामध्ये निर्गमित केले होते की, यासाठी एकूण तीन हजार रुपये इतके अनुदान मंजूर केले होते. परंतु यामध्ये शिंदे सरकारने आता वाढ केली असून अनुदानाची जी काही रक्कम असेल ती पाच हजार रुपये इतकी निश्चित केली आहे.

यासोबतच अनुदानाची जी काही रक्कम असेल ती मुलींच्या खात्यावर थेट जमा केली जाईल. जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल आणि या योजनेबद्दल संपूर्ण पात्रता व अटी जाणून घ्यायच्या असतील तर आजचा लेख शेवटपर्यंत वाचा.

योजनेसाठी अटी व शर्ती;

अर्ज करणारी व्यक्ती ही मुलगी असावी आणि ती मुलगी इयत्ता आठवी ते बारावी यापैकी कोणत्याही वर्गामध्ये शिक्षण घेत असावे.

अर्ज करणाऱ्या मुलीच्या घरापासूनचे शाळेपर्यंतचे अंतर कमीत कमी पाच किलोमीटर इतके असावे.

अर्ज करणारी मुलगी कोणत्याही जिल्हा परिषद शासकीय शासकीय आश्रम मध्ये शिक्षण घेत असावे. यासोबतच तिथून दररोज त्या मुलीचे येणे जाणे असावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करत असताना मुलीला काही आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये मुलींचे आधार कार्ड रेशन कार्ड या सोबतच पासपोर्ट साईज फोटो बोनाफाईड सर्टिफिकेट आदिवासी प्रमाणपत्र मतदान कार्ड रहिवासी दाखला यासोबतच सायकल खरेदी केलेला पुरावा इत्यादी अनुदानाचे पूर्तता करावी लागेल.

अनुदानाच्या माध्यमातून ज्या कुणी पात्र मुली ठरत असतील त्यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून डीबीटी द्वारे एकूण 3500 रक्कम मुलीच्या खात्यात जमा केली जाईल.

आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभार्थी मुलींना पंधराशे रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या मुली इच्छुक असतील त्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांचे संपर्क साधावा व आपला अर्ज सादर करावा.

सविस्तर शासन निर्णय (GR ) पाहण्यासाठी खाली नमूद लिंक वर क्लिक करावे ..

शासन निर्णय

publish By : Siddharth Pawar

Leave a Comment