पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 282 रुपये प्रति लिटर ! का झाली इतकी बिकट परिस्थिती ? पहा सविस्तर !

Spread the love

मराठीपेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : पाकिस्तान मधील लोकांची परिस्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे दिसून येत आहे. अगोदरच आर्थिक संकटाचा सामना करत असणाऱ्या पाकिस्तान देशावर अजून एक महागाईचा संकट ओढवला आहे . पाकिस्तान देशामडजे पेट्रोल पुन्हा आणखी महाग झाले आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान देशातील जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. या ठिकाणी आता पेट्रोल दहा रुपयांनी वाढले आहे.

ह्याच दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये सध्याचा पेट्रोलचा दर हा 282 रुपये प्रति लिटर इतका झाला असून पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार त्यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे. अशावेळी डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. परंतु रॉकेलच्या दरात वाढ केली आहे सूत्रांकडून असे कळले आहे. की पेट्रोलच्या दरात वाढ करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

परकीय चलनाचा साठा वाढावा याकरिता त्यांचे प्रयत्न होते. राज्य सरकारने आता ईद पूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा दिले नाहीत द न्यूज इंटरनॅशनल च्या माहितीनुसार प्रशासनाने ईद मुळेच एप्रिल महिन्याचा जो काही पगार असेल तो आणि आगाऊ पेन्शन असेल ती देण्याचा नकार केला आहे.

द न्यूज इंटरनॅशनल ह्या पाकिस्तानच्या पेपरनुसार अशी माहिती समजली आहे की, पाकिस्तानला सध्या चालू महिन्यामध्ये 110 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तूट झाल्याचे दिसून आले आहे. ही जी तूट आहे ती पेन्शन पगार वेतन विकास बजेटचीच आहेत. प्रदेशामधील वाढणाऱ्या वित्तीय तुटीच्या दरम्यान काळजीपूर्वक अशा पाकिस्तानच्या सरकारने ईद पगार या सोबतच पेन्शन यावर चर्चा करण्याकरिता थेट कॅबिनेटमध्ये बैठक बसवण्याची घोषणा केली आहे पाकिस्तानी सरकारकडे सध्या 13 अब्ज पाकिस्तानी रुपये फक्त शिल्लक आहेत.

Publish By : siddharth Pawar

Leave a Comment