सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये पुनरावलोकन करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून समिती स्थापना ! या मुद्द्यांचा करण्यात आला अंतर्भाव !

Spread the love

ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीमध्ये पुनरावलोकन करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .या संदर्भात वित्त विभागाकडून दि.06 एप्रिल 2023 रोजी ऑफीस मेमोरिंडम निर्गमित करण्यात आलेला आहे .या मध्ये नमुद करण्यात आलेले सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न विचारात घेता केंद्रीय वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समती स्थापन करण्यात आलेली आहे .या समितीमध्ये इतर तीन सदस्य असून कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे कार्मिक मंत्रालय , सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन विभागाचे सचिव ,तसेच विशेष सचिव परस खर्च विभाग ,त्याचबरोबर अर्थमंत्रालायाचे अध्यक्ष असे तीन जणांनी सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा :Mortgage Loan : अशाप्रकारे प्रॉपर्टीवर कमी व्याज दारात काढा कर्ज! प्रॉपर्टी वरील कर्ज सुविधा पहा !


सदर समितीला सरकारी कर्मचाऱ्यांच्या गरजा पुर्ण करणारा दृष्टिकोन विकसित करणे तसेच सामान्य नागरिकांचे रक्षण करणे या हेतुन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये बदल करण्याची बाब लक्षात घेवून सदर समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .तसेच सध्या लागु असलेल्या आराखड्याच्या संरचनेमध्ये कोणते बदल करणे आवश्यक आहे , याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

सदरचा बदल करताना वित्तीय होणारे परिणाम त्याचबरोबर अर्थसंकल्पी मध्ये , होणारे विपरित लक्षात घेवून , NPS मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीतुन त्यातमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय सुचविणे व वित्तीय विवेकबुद्धी सामान्य नागरिकांच्या सुरक्षा ठेवली जाईल . अशा पद्धतीने बदल करणेबाबत , अहवाल सादर करण्याचे आदेश सदर समितीला देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment