राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतनचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंतचा सादर करावा लागेल विकल्प ! अन्यथा मिळणार नाही लाभ !

Spread the love

राज्य शासन सेवेतील सन नोव्हेंबर 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन व रुग्णता निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्याकरीता विकल्प नमुना भरुन कार्यालय प्रमुखांकडे सादर करण्याच्या महत्वपुर्ण सुचना राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत .

सदर निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS )योजनेमध्ये सध्या कार्यरत असणारे अथवा यापुढे शासन सेवेत नियुक्त होणारे कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना , मृत्यु झाला असल्यास / रुग्णता सेवानिवृत्त झाला असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबत / राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तीवेतन ( PRAN ) मध्ये जमा असलेली संचत रक्कम पेन्शन विधी विनियमक व विकास प्राधिकरण यांनी दिलेल्या आदेशानुसार कुटुंबास / त्याला लाभ मिळण्याबाबत सदर निर्णयांमध्ये विकल्प नमुना देण्यात आलेला आहे .

सदर निर्णयामध्ये दिलेल्या विकल्प नमुना कर्मचाऱ्यांना शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून , 8 विकल्प नमुना 8 दिवसांच्या आता सादर करणे आवश्यक असणार आहे . म्हणजेच सदर निर्णय 31 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला तर ,31 मार्च 2023 पासुन आठ दिवस म्हणजेच दि.08 एप्रिल 2023 पर्यंत विकल्प नमुना सादर करावा लागणार आहे . दि.08 एप्रिल 2023 रोजी शनिवार सुट्टी असल्याने , दि.10 एप्रिल 2023 रोजी विकल्प नमुना कार्यालय प्रमुखांच्या सहमतीने सादर करता येईल .

वित्त विभागाच्या दि.31.03.2023 रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेले विकल्प नमुने डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

विकल्प नमुना

Leave a Comment