मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या रजा मंजुर करण्यात येतात , यामध्ये विशेष नैमित्तिक रजा काही ठराविक कामासाठी देण्यात येतात . केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा रजा नियमांनुसार रजा मंजुर करण्यात येतात तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी रजा नियम नुसार रजा मंजुर करण्यात येतात .
नुकतेच केंद्र सरकराने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विशेष नैमित्तिक रजा नियमांमध्ये बदल केला आहे . यामध्ये तब्बल 12 दिवसांची रजा वाढविण्यात आलेली आहे , यापुर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रासंगिक रजा ( Special Casual Leave ) म्हणून 30 दिवसांची रजा अनुज्ञेय करण्यात येत होती . आता यांमध्ये वाढ 12 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांनी विकल्प सादर करणेबाबत आत्ताची अत्यंत महत्वाची माहिती !
आता मिळणार 42 दिवसांची रजा –
आता विशेष नैमित्तिक रजा मध्ये एखादा कर्मचारी विशेष काम जसे कि एखादा कर्मचारी अवयव दान करत असल्यास अशा कर्मचाऱ्यांस मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते , यामुळे यापुर्वी देण्यात येणारी 30 दिवसांची रजा अपुरी पडते यामुळे आता या रजेमध्ये वाढ करण्यात आल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा ही 42 दिवसांची मिळणार आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य नागरी सेवा नियम मध्ये देखिल बदल करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांनी केल्यास , निश्चितच राज्य सरकार वरील नमुद सुधारित रजेप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना देखिल लागु करतील .
सरकारी कर्मचाऱी विषयक तसेच नोकरी पदभरती , शासन योजना यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा .