शासकिय कामकाज बाबत दिनांक 25 एप्रिल ते दि.25 मे 2024 या कालावधीमध्ये विशेष कृती कार्यक्रम (उन्हाळी अभियान) राबविणेबाबत GR निर्गमित !

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Vishesh Kruti Karyakram ] : कार्यालयीन कामकाज नियम पुस्तिकेतील प्रकरण , अभिलेखांचे वर्गीकरण करणे , त्यांचे निदंणीकरण करणे व ते नष्ट करणे या संबंधीच्या तरतुदी विहीत करण्यात आलेल्या आहेत , त्यानुसार कार्यवाही करण्या संबंधी मंत्रालयीन विभागांना वेळोवेळी सूचित करण्यात आलेले आहेत  .

मंत्रालय व नविन प्रशासकीय इमारतीमधील सर्व प्रशासकीय विभागांची कार्यालये स्वच्छ व निटनेटकी राहण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभागांनी दिनांक 25 एप्रिल ते दिनांक 25 मे 2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे कृती / उन्हाळी अभियान राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 25 एप्रिल ते दिनांक 25 मे 2024 या कालावधीत विभागातील अभिलेख / कागपत्रांचा आढावा घेवून कार्यासनातील नस्त्यांचे अ, ब , क व ड वर्गीकरण पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता सुधारण्यासाठी QCI मार्फत Kaizen Institute या संस्थेने मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभाग मार्फत 5 एस बाबत पुढील मुद्यांच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्यातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी संघटनेचे मोठे आव्हान !

यांमध्ये अ) निवड – काय आवश्यक आहे आणि काय नाही याप्रमाणे कागदपत्रे वेगळी करण्यात यावेत , ब) Set In Order – प्रत्येक गोष्टीसाठी जागा क) SHINE – सर्व काही स्वच्छ व आकर्षक ठेवण्यात यावेत , ड ) STANARDIZE – कामाच्या ठिकाणी संघटना आणि उत्पादकतेसाठी सुसंगततेला प्रोत्साहन देण्यात यावे .ई)Sustain – नियमांचे पालन आणि सुधारणेचा अवलंब करावा .अशा प्रकारच्या 5 एस ची प्रत्येक विभागाने तसेच प्रत्येक कार्यासनाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये क व ड वर्ग नस्त्यांची नियमानुसार ( जतन करण्याचा कालावधी संपल्याच्या नंतर ) उचित विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच अनावश्यक अभिलेखांचे निंदणीकरण पुर्ण करण्याचे तसेच विभागांनी ई-ऑफीसचा पुर्णपणे वापर करणे , बैठकांच्या सुचना इत्यादी ई-ऑफीसने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात सामान्‍य प्रशासन विभागांकडून दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment