राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 26.04.2024 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee DCPC Amount imp Shasan Nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभागांकडून दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत राज्यातील दिव्यांगाच्या 100 टक्के अनुदानित विशेष शाळा / कार्यशाळा / मतिमंद मुलांची बालगृहे यांमधील 100 टक्के अनुदानित पदांवरील ज्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांना पुढील परिस्थितीत अशंदानाच्या रकमा परत करणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच मृत्यु झाला असेल तर , तसेच कर्मचारी नियम वयोमानापुर्वी सेवात्याग केला असल्यस , तसेच कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यास तसेच दिनांक 01 नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजु झालेल्या ठरल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना खाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास , परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत अंशदानाची जमा होणारी रक्कम तसेच परताव्याची खर्च होणारी रक्कम जी-99 , 8342 इतर ठेवी , 00 तसेच 117 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची अपडेट ; महागाई भत्ता वाढीसह घरभाडे भत्ता ( HRA ) मध्ये होणार मोठी वाढ !

या योजना खालील रकमा ह्या संबंधित कर्मचाऱ्यांना / कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयांमध्ये नमुद शीर्षामधून परतावा म्हणून मंजूर करण्याकरीता आयुक्त , दिव्यांग कल्याण पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहेत . सदरचा खर्च हा सदर वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातुन भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .  

या संदर्भात दिव्यांग कल्याण विभागांकडून दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment