Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ New Pay Commission Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन आयोगाची स्थापना नविन सरकार स्थापनेनंतर करण्यात येणार आहे . कारण कर्मचारी संघटनांमार्फत मोठा दबाव या निवडणूकांमध्ये राजकिय पक्षांसाठी दिसून येत आहे .
आठवा वेतन आयोगाची ( New Pay Commission ) आवश्यकता : सध्याच्या घडीला महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पार करेल , त्यामुळे सातवा वेतन आयोगानुसार नियोजित इतर भत्यांचे अधिकतम प्रमाणाचा आकडा पार केला आहे . जसे कि , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता , इतर देय भत्ते मध्ये देखिल कमालीची वाढ डी.ए वाढीनंतर होणे अपेक्षित आहे , जे कि डी.ए दरावर अवलंबून असते .
नवा वेतन आयोग कधी लागु होणार : केंद्र सरकारकडून नविन वेतन आयोग लागु करणेबाबत नकारात्मक भूमिका दर्शविण्यात आलेली आहे , परंतु निवडणूका निकालानंतर , सत्ता स्थापनेनंतर 1 वर्षाच्या आतमध्ये 8 वा वेनत आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक असेल , कारण सन 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे .
कारण दर 10 वर्षांच्या अवधीनंतर नविन वेतन आयोग लागु करण्यात येत असतो . यापुर्वीचे वेतन आयोग पाहीले असता पाचवा वेतन आयोग 1997 साली लागु करण्यात आला , तर सहावा वेतन आयोग हा 2006 साली तर सातवा वेतन आयोग सन 2016 साली केंद्र सरकारने लागु केला होता . म्हणजेच प्रत्येक वेतन आयोगांमध्ये 10 वर्षांचा अवधी आहे . यानुसार आता सन 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे .
मुळ वेतनांमध्ये होणार मोठी वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना आता आठवा वेतन आयोगानुसार 3.68 पट फिटमेंट फॅक्टर ( कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार ) प्रमाणे किमान मुळ वेतनांमध्ये 8,000/- इतकी वाढ होणार आहे . ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय भत्ते मध्ये देखिल मोठी वाढ होणार आहे .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024