मराठी पेपर , बालाजी पवार ,औरंगाबाद : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे नविन पेन्शन योजनेमध्ये , माहे मार्च 2021 पर्यंत जमा असणाऱ्या रकमेवरील व्याज माहे जानेवारी 2023 मध्ये NPS मध्ये वर्ग करण्यात आले आहेत . तर माहे एप्रिल 2021 ते माहे नोव्हेंबर 2022 या तब्बल 20 महिन्यांच्या कालावधीमधील सुमारे 25 कोटी रुपयांचे व्याज एनपीएस मध्ये वर्गच करण्यात आले नसल्याने हे पैसे नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे .
या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना , जुनी पेन्शन हक्क लढा सेना , औरंगाबाद संघटनांकडून जाब विचारला असता आता प्रशासनांकडून वरिष्ठ कार्यालयांकडून माहिती मागविण्यात येत आहे . यामध्ये शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी महाराष्ट्र वि.र.परमार कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून सदर शिक्षक कर्मचारी DCPS जमा रक्कम NSDL ला वर्ग करतांना दिलेल्या व्याजाबाबद मार्गदर्शन मागविण्यात आले आहे .
यांमध्ये नमदु करण्यात आले आहे कि , शासन निर्णय दि.19.09.2019 DCPS कर्मचारी यांना एनपीएस योजना लागू करण्यात आली आहे , त्यानुसार कर्मचारी यांचे DCPS जमा रक्कमेवर दि.31.03.2021 पर्यंत व्याजाची परिगणना करुन NSDL ला रक्कम वर्ग करण्याची सुचना आहेत त्यानुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडुन लेखे पुर्ण करुन दि.31.03.2021 पर्यंत जमा रक्कमेवर व्याजाची परिगणना करुन शिक्षक कर्मचारी यांच्या रक्कम मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना 1496 शिक्षक कर्मचारी यांचे रक्कमा NSDL वर्ग केलेल्या आहेत .
हे पण वाचा : नवीन वेतन आयोग ( 8th Pay Commission ) बाबत आत्ताची मोठी अपडेट !
त्यावर शिक्षक संघटना यांनी आक्षेप घेतला आहे त्यांनी व्याजाच्या रक्कमेबाबत दिलेल्या निवेदनानुसार , शिक्षक कर्मचारी यांच्या DCPS जमा रक्कम NSDL वर्ग करतांना विलंबाने वर्ग केलेले आहे . परंतु सदर रक्कमेवर शासन निर्णयानुसार दि.31.03.2023 पर्यंत व्याज देय असल्याने या दिनांक पर्यंत व्याजाची परिगणना करुन व्याजासह रक्कम वर्ग करण्यात आलेल्या आहेत . असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी संदर्भिय बैठकी मध्ये नमुद केलेले आहेत .
त्यामुळे शिक्षक कर्मचारी यांचे व्याजाचे नुकसान झालेले आहे म्हणून सदरच्या वर्ग दिनांक पर्यंत व्याज देण्यात यावे अशी श्री.दिपक पवार राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना , जुनी पेन्शन हक्क लढा सेना , औरंगाबाद यांनी मागणी केलेली आहे . यावर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी राज्याचे मा.वि.र.परमार यांना याबद्दल मार्गदर्शन मागविले आहे .