राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 42% DA वाढीबाबतचा प्रस्ताव अखेर तयार ! पगार / पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ !

Spread the love

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ 4  टक्के वाढ करणेबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , या बाबतचा अधिकृत्त निर्णय निर्गमित करुन सेंट्रल मधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के म्हणजेच 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत .

सदरची डी.ए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून लागु केल्याने , जानेवारी , फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या डी.ए फरकास माहे मार्च महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव डी.ए लागु करण्यात आले आहेत . केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान राज्य सरकारने देखिल राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये लगेच 4 टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला .

यानंतर आता महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी देखिल डी.ए बाबत आत्ताची गोड बातमी समोर येत आहे , ती म्हणजे  राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे डी.ए मध्ये 4 टक्के वाढ करणेबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहीती समोर येत आहे .सदर डी.ए वाढीचा प्रस्ताव आता मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात येईल . त्यानंतर अधिकृत्त निर्णय घेण्यात येणार आहे .

सध्या राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारकांना 38 टक्के प्रमाणे डी.ए लाभ मिळत आहेत , आता यांमध्ये आणखीण चार टक्के वाढ झाल्यास , एकुण महागाई भत्ता हा 42 टक्के होणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना / पेन्शन धारकांना वेतन / पेन्शनमध्ये मोठी वाढ लागु होणार आहे .

Leave a Comment