कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF Update) : पीएफ खात्यांमधील पैसे काढणेबाबत नियमांमध्ये बदल ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ PF Withdrawn Update ] : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये कर्मचारी विशिष्ट रक्कम दरमहा ( कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे ) गुंतवणुक करण्यात येते . नुकतेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याजदरांमध्ये वाढ लागु करण्यात आलेली आहे . चालु आर्थिक वर्षाकरीता 8.25 टक्के इतका व्याजदर लागु करण्यात आलेला आहे .

कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट कारणास्तवच सदर खात्यांमधून कमाल 75 टक्के ( जास्तीत जास्त ) रक्कम काढता येते , नुकतेच केंद्र सरकारने सदर खात्यांमधून पैसे काढण्याच्या नियंमामध्ये बदल करण्यात आलेला आहे . सदर नविन नियमानुसार , कर्मचारी जर आजारी पडल्यास , उपचाराकरीता दुप्पट पैसे काढता येतील .

जी कि EPFO मार्फत अर्ज क्र.31 च्या पॅरा 68 अंतर्गत सदर पैसे काढण्याची मर्यादा ही 50,000/- रुपये वरुन 1,00,000/- रुपये इतकी करण्यात आलेली आहे . सदर अर्ज क्र.31 हा पीएफ खात्यामधून वेळेपुर्वी पैसेक काढण्याकरीता वापरण्यात येत असतो . यांमध्ये घर बांधणे / खरेदी करणे , लग्न कार्यासाठी , वैद्यकीय उपचारासाठी पैसे काढले जावू शकते . पॅरा 68 अंतर्गत कर्जांची परतफेड करण्याकरीता पैसा काढला जावू शकतो .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची अपडेट ; महागाई भत्ता वाढीसह घरभाडे भत्ता ( HRA ) मध्ये होणार मोठी वाढ !

पीएफ व्याजदरांमध्ये वाढ : पीएफ व्याजरांमध्ये चालु आर्थिक वर्षाकरीता 8.15 टक्के व्याजदरापासून 8.25 टक्के इतका व्याजदर वाढविण्यात आला आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ मधील गुंतवणुक पैशावर मोठा फायदा होणार आहे .

Leave a Comment