पेन्शन संदर्भात छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती . या याचिकेवर मा. खंड पीठ न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिलेला आहे . या संदर्भातील सविस्तर याचिका व यावर न्यायालयाने दिलेला सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .
जायकवाडी पाटबंधारे विभागामधून सेवानिवृत्त झालेले शेख निजाम शेख नन्हुमियाँ हे कार्यकारी या पदांवरून सन 2016 मध्ये सवानिवृत्त झाले होते . सेवानिवृत्तीनंतर त्यांना नियमित पेन्शन पाटबंधारे विभागाकडून सुरु करण्यात आलेली होती , परंतु सन 2021 मध्ये त्यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात त्यांना दोन पत्नी होत्या , त्या दोन्ही पत्नीने आपल्या पतीच्या पेन्शनसाठी हक्क सांगितला .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय होणार 60 वर्षे !
शेख निजाम यांनी सेवेत असताना पहिल्या पत्नीची नोंद वारस म्हणून केली होती , त्यानंतर दुसऱ्या पत्नीची देखिल नोंद केली होती . परंतु पेन्शन नामनिर्देशित अर्जामध्ये , त्यांनी पहिल्या पत्नीचे नाव वगळले होते . यामुळे त्यांची पहिली पत्नी हजराबी यांनी पेन्शनमधील 50 टक्के रक्कम मिळावे यासाठी ॲड. रविंद्र गोरे यांच्यामार्फत मॅट खंडपीपाठामध्ये याचिका दाखल केली होती .
या याचिकेवर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलासादायक निर्णय देत शेख निजाम यांच्या दोन्ही पत्नी पेन्शनसाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे .शेख निजाम यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव शकीलाबी असे असून , त्यांना शेख निजाम यांनी नामनिर्देशन फॉर्ममध्ये नाव नोंदविले होते .