शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाकरीता बालकांचे शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित ! शासनाचे परिपत्रक पाहा !

Spread the love

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या शैक्षणिक सत्रांमध्ये आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन दि.19 जानेवारी 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्य शासनाच्या या परिपत्रकानुसार बालकांना प्ले ग्रुप / नर्सरी ते इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे .

राज्य शासनांच्या दि.18.09.2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार सन 2023-24 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानिव दि.31 डिसेंबर करण्यात आला आहे . या परिपत्रकानुसार असे नमूद आहे की ,प्रवेशा करीत शासनाने किमान वय निश्चित केली आहे पण , कमाल वय ठेवले नाही .मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी आरटीई 25 टक्के प्रवशासाठी वयोमर्यादा दि.31 डिसेंबर 2023 अखेर पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे .

प्ले ग्रुप / नर्सरी – प्ले ग्रुप नर्सरी करीता बालकांचे जन्म 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधी मध्ये झालेला असावा .तर दि.31.12.2023 रोजी बालकाचे किमान वय 3 वर्षे तर कमाल वय 4 वर्षे 5 महिने 30 दिवस या दरम्यान निश्चित करण्यात आलेले आहेत .

ज्युनिअर केजी – ज्युनिअर केजी प्रवेशाकरीता बालकांचा जन्म हा 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान झालेला असावा , तर बालकांचे दि.31.12.2023 रोजी किमान वय 3 वर्षे तर कमाल वय 4 वर्षे 5 महिने 30 दिवस दरम्यान असणे आवश्यक आहे .

सिनियर केजी – सिनियर केजी प्रवेशाकरीता बालकांचा जन्म 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान झालेला असावा , तर दि.31.12.2023 रोजी बालकाचे किमान वय 3 वर्षे तर कमाल वय 6 वर्षे 5 महिने 30 दिवस दरम्यान असणे आवश्यक आहे .

इयत्ता 1 ली – इयत्ता पहीली प्रवेशाकरीता बालकाचा जन्म 01 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या दरम्यान झालेला असावा तर 31.12.2023 रोजी किमान वय 06 वर्षे तर कमाल वय सात वर्षे 05 महिने 30 दिवस या वयोमाना दरम्यान असावे .

या संदर्भात शाळा प्रवेश निश्चितीबाबतचा सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment