Breaking News : आता राज्यातील नागरिकांना धान्या ऐवजी मिळणार पैसे , प्रतिव्यक्ती ऐवढे मिळणार पैसे !

Spread the love

मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी खुशखबर दिले आहे , ती म्हणजे आता राज्यातील नागरिकांना धान्यांऐवजी खात्यावर पैसे येणार आहेत .ही योजना केंव्हापासून लागू होणार आहे , प्रतिव्यक्ती किती पैसे मिळणार आहेत , याबाबतची सविस्तर वृत्ती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सध्या केशरी रेशन कार्डधारकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रत्येक महीन्यांना एकाला 5 किला धान्य ज्यांमध्ये 2 किलो गहू तर 3 किलो तांदूळचा समावेश आहे . हे धान्य भारतीय अन्न महामंडळाकडून सवलतीमध्ये खरेदी करण्यात येत असते ज्यांमध्ये केंद्र सरकारकडून विशेष अनुदान देण्यात येत असते . परंतु यापुढे धान्य वाटप करण्यासाठी धान्य उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने राज्य सरकारला कळविल्याने यापुढे राज्य सरकारकडून धान्यांऐवजी नागरिकांच्या थेट खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहेत .

या निर्णयांनुसार राज्यातील 14 जिल्हे यांमध्ये छत्रपती संभाजीनगर , बीड , नांदेड , लातुर , जालना , परभरणी , धाराधिव , हिंगाली , अकोला , वाशिम , यवतमाळ , वर्धा , अमरावती ,बुलढाणा समावेश आहे .या योजनेनुसार आता प्रतिव्यक्ती 150/- रुपये कुटंबातील महिला प्रमुखांच्या बँक खात्यांमध्ये  प्रतिमहा जमा करण्यात येणार आहेत . म्हणजेच एका कुटुंबामध्ये 5 सदस्य असतील तर त्या कुटंबातील महिला प्रमुखाच्या बँक खात्यात 750/- रुपये  प्रतिमहा जमा करण्यात येतील .

यांमध्ये केशरी , दारिद्रय रेषेखालील , अंत्योदय रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे .यामुळे नागरिकांच्या धान्याबरोबरच किराणा मालाचा खर्च भागणार आहे .या 14 जिल्ह्यांमध्ये ही योजना यशस्वीरीत्या राबविली गेल्यास संपुर्ण राज्यात ही योजना राबविली जाणार आहे .या योजनेचा शुभारंभ जानेवारी 2023 पासूनच करण्यात येणार होती परंतु काही कारणास्तव ही योजना दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .

हे पण वाचा : पत्नीच्या नावावर खरेदी केलेली संपत्ती कोणाला मिळते , जाणून घ्या कोर्टाचा निकाल !

Leave a Comment