आता राज्य कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार परीक्षा ! प्रसिद्धीपत्रक निर्गमित !

Spread the love

मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी मुंबई , पुणे , नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहे . सदर परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत , कार्यालयाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे दिनांक 12 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक असणार आहे .

यामध्ये अराजपत्रित कर्मचारी व राजपत्रित अधिकाऱ्यांची माहे जून 2023 मधील हिंदी भाषा निम्नश्रेणी परीक्षा हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळाच्या सुधारित अभ्यासक्रमाचे इयत्ता दहावीसाठी निश्चित केलेले लोकभारती या पुस्तकावर आधारित घेण्यात येणार आहे . हिंदी भाषा उच्चश्रेणी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळाच्या इयत्ता दहावी साठी मार्च /एप्रिल 2018 मध्ये निश्चित केलेले कुमारभारती या पुस्तकावर आधारित घेण्यात येणार आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आता 42% दराने महागाई भत्ता !

प्रश्नपत्रिका क्रमांक दोन च्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात येणार नाही .परीक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी सदर आवेदन पत्रात उमेदवारांचे पूर्ण नाव , कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकासह आवेदन पत्र परिपूर्ण भरून मूळ चलनासह संबंधित कार्यालयाकडे उपरोक्त नमूद केलेल्या तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक असणार आहे .

भाषा संचालनाचे संकेतस्थळ directorate.marathi.gov.in असे असून एतदर्थ मंडळाच्या परीक्षेसंबंधीची व परीक्षा शुल्कासंबंधीची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . तसेच उपलब्ध परीक्षांची कार्यक्रम पत्रिका संकेतस्थळावर परीक्षापूर्वी प्रसिद्ध करण्यात येणार आहे .

या संदर्भातील भाषा संचालक मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले सविस्तर प्रसिद्धपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता !

राज्यातील कर्मचारी विषयक नियमित अपडेट करिता Whatsapp Group मध्ये सामील व्हावे !

Leave a Comment