या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता म्हणून प्रतिवर्षी  30,000/-रुपये मंजुर ; GR निर्गमित दि.21.03.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rs. 30,000/- per annum sanctioned as medical allowance to these state officers/employees ] : राज्यातील या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता म्हणून प्रतिवर्षी 30,000/- रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम 1959 मधील कलम 15 च्या उपकलम ( 6 ) मध्ये परिषदेस या अधिनियमाखालील कर्तव्ये व कार्ये पार पाडण्याच्या प्रयोजनार्थ आवश्यक असतील अशा इतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या व पदनामे व त्यांचे वेतन / भत्ते व सेवेच्या इतर शर्ती विनियमांद्वारे ..

वेळोवेळी विहीत करण्याबाबत , तरतुद आहे . सदर निर्णयानुसार महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद या कार्यालयाीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपाचारावर होणारा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्षी 30,000/- इतका वैद्यकीय भत्ता सन 2024-25 या आर्थिक वर्षापासुन अटी व शर्तींच्या अधीन राहून अदा करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे .

हे पण वाचा : ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , प्रशासक , वॉर्डन / मॅट्रोन , चौकीदार इ. पदांसाठी थेट पदभरती..

अटी / शर्तीमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , वैद्यकीय भत्त्यापोटी अदा करावयाची रक्कम परिषदेने आपल्या स्वनिधीतून भागविण्याचे व सद्य: स्थितीत तसेच भविष्यात वैद्यकीय भत्त्यासाठी शासनाकडून परिषदेस कोणत्याही स्वरुपाचे अर्थसहाय्य करण्यात येणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment