नविन शैक्षणिक धोरणातील काही आधुनिक संकल्पनेच्या महत्वपुर्ण बाबी ; शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्वपुर्ण !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important aspects of modern concepts in the new education policy ] : राज्याचे मा.शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या घोषणानुसार राज्यात टप्याने सीबीएसई पॅटर्न लागु करण्यात येणार आहेत . सदर सीबीएसई पॅटर्न व नविन शैक्षणिक धोरण यंदाच्या वर्षीपासुन नव्यानेच सुरुवात करण्यात येणार आहेत , यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना हे धोरण नविन असणार आहेत .

सदर नविन शैक्षणिक धोरणांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांचे हित लक्षात घेवून सदरचे धोरण तयार करण्यात येणार असून , यांमध्ये विविध शैक्षणिक धोरण तसचे शिक्षकांना प्रशिक्षण राबविण्यात येणार आहेत .

गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणावर अधिक भर : नविन शैक्षणिक धोरण हे गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षणावर अधिक भर दिले जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . यांमध्ये शाळांना आवश्यक पायाभुत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहेत .

प्रवेश प्रक्रिया : शिक्षकांची भरती ही ऑनलाईन स्वरुपाची असून , टीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षकांची भरती केली जाणार असून , सदर पदभरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन केली जाणार आहे . त्याचबरोबर इयत्ता 11 वी चे प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरुपाची राहील असे नमुद करण्यात आले आहेत .

शिक्षकांना इतर कामातुन मिळणार सुट : शिक्षकांना अशैक्षणिक कामातुन सुटका मिळणार आहे . ज्यामुळे शिक्षकांना शिक्षणांवर अधिक भर देता येणार आहे .

विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक हेल्थ कार्ड : विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या सहकार्याने हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे , ज्याच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे .

विद्यार्थ्यांना कला / क्रिडा क्षेत्रांमध्ये अधिक निपुनता मिळावी याकरीता राज्यांमध्ये 08 विशेष शाळा सुरु करण्यात येणार आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment