अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुर करण्याचे आदेश राज्य शासनांकडून निर्गमित दि.28.04.2023

Spread the love

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजुर करण्याबाबत राज्य शासनांच्या राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे , कडून दि.28.04.2023 रोजी महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे .

यामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुगणता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयातील तरतुदी दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / NPS प्रणाली लागु असलेल्या कर्मचाऱ्यांना लागु आहेत .

दि.01 नोव्हेंबर 2005 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सद शासन निर्णयामध्ये नमुद नमुना क्र.03 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे .त्यानंतर कुटुंबनिवृत्तीवेनत धारकाला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना / NPS निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल , असे नमुद करण्यात आले आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित दराने भत्ता लागू करणेबाबत GR निर्गमित !

या अनुषंगाने राज्यातील सर्व कोषागरे कार्यालयांना कळविण्यात आले आहे कि , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत आपणाकडे सादर करण्यात आलेले मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच , रुग्णता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे Exit Withdrawal चे प्रस्ताव प्राप्त झाले असल्यास त्यांचे संदर्भिय शासन निर्णयानुसार , विहीत नमुन्यातील विकल्प प्राप्त करुन घेण्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांना कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

Exit Withdrawal कार्यवाही शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याच्या तरतुदी नुसार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .1982 अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय होण्याबाबतचा विकल्प दिल्यास , कोषागारे कार्यालयांना प्राप्त झालेल्या Exit Withdrawal चा प्रस्ताव आक्षेपित करुन संबंधित कार्यालयास परत करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश लेखा व कोषागारे कार्यालयांकडून देण्यात आले आहेत .

या संदर्भात राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे कार्यालयांकडून दि.28.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर आदेशाची PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन आदेश

Leave a Comment