या दिवशी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांना ‘ भरपगारी रजा ‘ देण्याचा मोठा निर्णय ! GR निर्गमित !

Spread the love

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : भरपगारी रजा कर्मचाऱ्यांना विशेष कामासाठी / हक्क , अधिकारांसाठी देण्यात येत असते अशीच रजा राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करणेबाबत , दि02 मे 2023 रोजी उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना प्रत्येक निवडणीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे . ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधत्व कादया 1951 मधील कलम 135 नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते .

भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वात्रिक निवडणूक 2023 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे . सदर निवडणूकीचे मतदार बुधवार दि.10 मे 2023 रोजी होणार आहे , कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील समीमा लगतच्या यांमध्ये सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सांगली , उस्मानाबाद , लातुर , नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत .तथाप‍ि त्यांची नावे कर्नाटक राज्यातील मतदार यांदीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी एक दिवसांची भरपगारी रजा मंजुर करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्याच्या धोरणामध्ये सुधारणा बाबत GR !

यांमध्ये निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निणडणूक होणाऱ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे .

सदर सुट्टी उद्योग , ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणऱ्या सर्व उद्योग समुह , महामंडळे , कंपन्या व संस्थामध्ये , औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना , इत्यादींना देखिल लागु करणार आहे .

या संदर्भातील उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दि.02 मे 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

शासकीय कर्मचारी विषयक नियमित अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment