राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट सक्तीचे , अन्यथा होणार कार्यवाही !

Spread the love

मराठी पेपर , राहुल पवार पुणे प्रतिनिधी : सध्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत , या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाणे अधिक आहेत .हेल्मेट नसल्याने अपघातांमध्ये दुचाकीस्वरार दगावत असल्याने आता प्रशासनांकडून हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहेत . जे कुणी हेल्मेट वापरत नाहीत अशांवर आता कार्यवाही करण्याचे तंत्र पुणे प्रादेशिक परीवहन ( आरटीओ ) कडून करण्यात येत आहेत .

यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना प्रथम धारेवर धरण्यात आलेले आहेत , पुण्यातील राज्य , केंद्र सरकारी , सार्वजनिक संस्था , महामंडळे , बँका अशा कायालयांमध्ये पुणे परीवहन आरटीओने प्रत्यक्ष भेट देवून हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . जर सरकारी कर्मचारी जर नियमांचे पालन करत नसतील तर सर्वसामन्य जनता आपल्याकडून कोणता आदर्श घेतील .

यामुळे प्रथम सरकारी कर्मचाऱ्यांने जर हेल्मेट सक्तीने वापरण्यास सुरुवात केली तर सर्वसामान्य जनतेपुढे नवा आदर्श निर्माण होईल व नागरिक हळूहळू हेल्मेटचा वापर करण्यास सुरुवात करतील .

जे कर्मचारी यापुढे हेल्मेटचा वापर करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आरटीओ नियमांतर्गत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पुर्ण आरटीओने सांगितले .यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर आता कठोर कार्यवाही पुणे आरटीओ कडून करण्यात येणार आहेत .

जे कर्मचारी दुचाकी वापरत असतील अशा कर्मचाऱ्यांना यापुढे हेल्मेट परीधान करणे सक्तीचे असणार आहेत , न वापरल्यास कर्मचाऱ्यांकडून यापुढे 500/- दंड घेतला जाणार आहे . ही कार्यवाही प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या कार्यरत कार्यालयांमध्ये जावून करण्यात येणार आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी यापूढे वाहतुक नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहेत .अशी माहिती पुणें परिवहन कार्यालयाचे अधिकारी डॉ.अजित शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांनी दिली .

Leave a Comment