मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर लागु करण्यात आलेले कुंटुबनिवृत्ती वेतन / मृत्यु उपदान / रुग्णता निवृत्तीवेतन व सेवा निवृत्ती उपदान या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सन 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यु झाल असल्यास , सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आली आहे . तसेच मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान त्याचबरोबर शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजुर करणेबाबत वित्त विभागांकडुन निर्गमित शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : राज्यातील शाळांना या कालावधीत उन्हाळी सुटी जाहीर !
वित्त विभागाच्या वरील नमुद प्रकरणी दि.20.04.2023 रोजी निर्गमित शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला असून , दि.31.03.2023 रोजी शासन निर्णयांमध्ये जेथे सेवा उपदान अशा प्रकारचे मजकुर नमुद आहे त्या ठिकाणी सेवानिवृत्ती उपदार असे वाचण्यात यावे . असा शुद्धीपत्रक राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील वित्त विभागांकडून दि.20.04.2023 रोजी निर्गमित शासन शुद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.