राज्यांमध्ये सध्या उष्माघातांचे प्रमाणे अधिकच वाढले असल्याने , राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जाहीर करणे व शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.20 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार , राज्यांमध्ये काही दिवसांपासून तापमानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे . यामुळे सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने , प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची त्याचबरोबर शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत .
या शासन परिपत्रकानुसार , राज्य शासन सेवेतील राज्य मंडळाच्या अधिनस्त सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना दि.21 एप्रिल 2023 पासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येत आहेत .तसेच राज्यातील इतर मंडळ अंतर्गत कार्यरत शाळा वेळापत्रकानुसर सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास , विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
तसेच विदर्भातील शाळा वगळता राज्यातील इतर सर्व शाळा दि.15 जून रोजी , व त्या दिवशी सुटी असल्यास पुढील दिवशी पासून सुरु करण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत . तर विदर्भातील शाळा उन्हाच्या तीव्रतीमुळे दि.30.06.2023 किंवा जर त्या दिवशी सुटी असल्यास पुढील दिवशी पासून सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
शाळांना सुटी संदर्भातील दि.20.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024