राज्य कर्मचाऱ्यांचा दि.14 मार्च ते 20 मार्च असे एकुण सहा दिवस जुनी पेन्शन या मागणीकरीता राज्यव्यापी संप सुरु होते , या कालावधीमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित होण्याची भिती कर्मचाऱ्यांवर होती . परंतु राज्य शासनांकडून याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन सेवा खंडित न करता नियमित रजा कापण्याच निर्णय घेण्यात आलेला होता .
ही रजा असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरण्यात येत होती परंतु असाधारण रजेमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन / इतर भत्ते अदा करण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी होती . म्हणून संप काळातील वेतन देण्यात यावी या मागणीकरीता राज्याचे मुख्यमंत्री व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक संपन्न झाली .
या बैठकीमध्ये संप कालावधीमधील कर्मचाऱ्यांचे वेतन न कापता नियमित रजा कापण्यात येईल .याविषयीचा सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे .संपकाळावधीमधील वेतन अदा करण्यात यावेत अशी मागणी करण्याचे पत्र संघटनेना तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आलेले होते .यामुळे संपकाळातील कर्मचाऱ्यांचा पगार आहरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .