शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लाभ घेण्यासंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुचना निर्गमित ! GR निर्गमित !

Spread the love

राज्य शासन सवेत सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन त्याचबरोबर सेवानिवृत्ती उपदान लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.31 मार्च 2023 रोजी शासन निर्णयान्वये महत्वपुर्ण सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

केंद्र सरकारच्या Central Civil Services ( Implemendation Of National Pension System ) Rules 2023 दि.30.03.2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा शासन सेवेत असतानाच मृत्यु झाला असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्तीवेतन तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन लागु करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : कुटुंबनिवृत्ती वेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लाभ घेण्यासाठी ” हे ” विकल्प करावे लागणार सादर !

यानुसार राज्य शासनाने आता निर्णय घेतला आहे कि ,शासन सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटंबाला कुटुंब निवृत्तीवेतन / मृत्यु उपदान देण्यात येतील . त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान लागु करणेबाबत राज्य शासनाने वित्त विभागाच्या दि.31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे .

सदरचा शासन निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा , कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित प्राथमिक / माध्यमिक त्याचबरोबर कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता असणारे व अनुदानित अशासकीय महाविद्यालये त्याचबरोबर कृषी विद्यापीठे तसेच तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना सदरचा शासन निर्णय योग्य त्या फेरफेरांसह लागु असणार आहे .

सादर करावयाचे विकल्प नमुने डाउनलोड करा !

Leave a Comment