New Pay Commission ( 8 th Pay Commission ) : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन आयोग / आठवा वेतन आयोगांमध्ये पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे .नविन वेतन आयोगा संदर्भात केंद्र सरकारकडून नविन अपडेट जारी करण्यात आले आहेत .
नवा वेतन आयोग स्थापन करण्यात येणार – केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 पर्यंत नविन ( आठवा वेतन आयोग ) लागु करण्याकरीता लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात येणार आहे . या आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन फॉर्म्युल्यानुसार नवा वेतन आयोग लागु करण्यात येईल , यांमध्ये सध्याच्या वेतनाच्या तब्बल 44 पट वाढ होण्याची शक्यता आहे .
सध्याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर हा 2.67 पट आहे तर , केंद्रीय कामगार युनियनच्या मागणीनुसार , फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पटी पर्यंत वाढ करण्यात येणार आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हा 18 हजार रुपये मध्ये वाढ होवून चक्क 26,000/- होईल .नविन वेतन आयोग लागु केल्यास इतर लागु असणाऱ्या वेतन / भत्त्यांमध्ये देखिल बदल होईल , महागाई भत्ताचा दर पुन्हा 0 टक्के होइ्रल .
यासाठी वेतन आयोगाची स्थापना 2024 मध्ये करण्यात येईल तर प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग / नवा वेतन आयोग सन 2026 मध्ये लागु होऊ शकतो .सन 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका असल्याने कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची स्थापना करुन कर्मचाऱ्यांना भेट देण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
शासकीय कर्मचारी , नोकरी पदभरती ,राजकिय / सांस्कृतिक व राजकिय अपडेट साठी खालील Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !