आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखिल मिळणार निवृत्तीनंतर मानधन तत्वावर नोकरी , जाणून राज्य माहिती !

Spread the love

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य सरकारने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नविन योजना काढली आहे , ती योजना म्हणजे शिक्षण सारथी योजना होय . या योजनेच्या माध्यमातुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे , याबाबतची सविस्तर अपडेट काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचे शाळांची पटसंख्या ही 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी झालेली आहे , अशा शाळांमध्ये नियमित 2 ते 3 शिक्षक ठेवणे राज्य सरकारला परवडणारे वाटत नाहीत . याकरीता राज्य सरकारने नविन शिक्षण सारथी योजना लागु करण्याचा विचार केला आहे .यानुसार ज्या शाळांची पटसंख्या ही 20 पेक्षा कमी झाली आहे अशा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत .

परंतु त्या शाळेवर नियमित शिक्षकांची नियुक्ती न करता मागील 01 ते 02 वर्षांखाली सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची नियुक्त करण्यात येणार आहे , अशा शिक्षकांना नियमित पगार न देता प्रतीमहा 20 हजार रुपये मानधन देण्याची मोठी भूमिका राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे .असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांनी तयार करुन राज्य शासनांला सादर केल्याची माहिती सुत्रानुसार समोर येत आहे .

सध्या राज्यांमध्ये पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे जास्त वळत असल्याने राज्यातील जिल्हा परिषदा शाळा हळूहळू बंद होत आहे , परिणामी जिल्हा परिषदेचे 1 ते 4 वर्षांसाठी नियमित 1 अथवा दोन शिक्षकांची नियुक्ती करणे राज्य सरकारला परवडणारे नाहीत .यामुळे शिक्षण सारथी हा नवा उपक्रम राज्य शासनांकडून राबविण्यात येणार आहे .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी , लागू होणार नवा वेतन आयोग !

शिक्षण सारथी भुमिका / मानधन – शिक्षण सारथी म्हणजे सेवानिवृत्तीनंतर पुढील 2 वर्षांकरीता आपल्या गावातीलच / जवळच्या शाळेमध्ये ( कमी पटसंख्या असणाऱ्या शाळैवर ) आणखीन नोकरी करता येणार आहे . याकरीता 20,000/- रुपये ऐवढे मासिक मानधन अदा करण्यात येणार आहे .

राज्य शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , राजकीय / सामाजिक व आर्थिक घडामोडीच्या अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment