@marathipepar वैशाली पवार प्रतिनिधी [ Important for teachers: Important government circular issued regarding senior/selection category, informing teachers.. ] : शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण अंतर्गत शालार्थ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणे बाबत , संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्या प्रति शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 15 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरचे परिपत्रक हे संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय , पुणे कार्यालयाकडून प्राप्त शालार्थ एपीआय च्या संदर्भानुसार निर्गमित झालेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 11 मार्च 2025 रोजी शालार्थ एपीआय प्राप्त झालेला आहे , या डेटाची तपासणी करण्यात आली असता ..
शिक्षकांची माहिती ( यांमध्ये मराठीतुन नाव , ईमेल आयडी ) अपुर्ण असल्याचे निर्देशास आले आहेत . तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर , शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे , त्यामुळे ही माहीती शालार्थमध्ये अपडेट होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरु होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत , तसेच त्याकरीता प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे , ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त आाहे . अशा शिक्षकांची शालार्थ मधील माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे …
त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास , ती अपडेट करणेबाबत , सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरुन कळविण्याचे नमुद करण्यात आले आहेत .

- राज्यातील “या” जिल्ह्यांना पुढील 24 तासात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी !
- राज्य सरकारच्या ‘या” योजनेअंतर्गत पदवीधारकांना मिळणार दरमहा 61,500/- विद्यावेतन ; GR निर्गमित दि.03.04.2025
- दिनांक 03 , 04 व 05 एप्रिल रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा : जाणून घ्या हवामान अंदाज !
- माहे मार्च 2025 चे वेतन देयक संदर्भातील महत्वपुर्ण सुचना ; अधिक्षक वेतन व भ.नि.निधी पथक परिपत्रक दि.01.04.2025
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर कात्री ; नविन नियमावली !