दोन-तीन मुले असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणेबाबत राज्य सरकाचा घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात !

Spread the love

मराठी पेपर , संगिता पवार : सिक्कीम राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणेबाबत घेतलेला निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे . निर्णय जरी चांगला असला तरी दुसऱ्या बाजुने विचार केला असता हा निर्णय लोकसंख्या वाढीला चालना देणार निर्णय ठरत असल्याने , यावर अनेक बाजुंने टिका करण्यात येत आहेत .

नेमका निर्णय काय आहे – सिक्कीम राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन – तीन आहेत अशांना अतिरिक्त पगारवाढ तसेच वाढीव इन्सेन्टीव्ह देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .सिक्कीम राज्याचे सचिव रिंजिंग चेवांग भूतिया यांनी दि.10.05.2023 रोजी जाहीर केलेल्या अधिसुचनेंमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . कि 01 जानेवारी हा निर्णय पुर्वलक्षी प्रभावांने लागु करण्यात आलेला आहे .

यांमध्ये सांगितले आहे कि ज्यांना जानेवारी पासून दोन अपत्ये आहेत , अशांना पगारात वाढ केली जाईल तर ज्यांना तीन अपत्ये आहेत अशा सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात चांगलीच वाढ करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे .

भारत देश हा लोकसंख्येच्या तुलनेत सन 2023 मध्ये चीन देशाला मागे टाकत प्रथम स्थानावर आले असले तरीही सिक्कीम राज्य सरकारने लोकसंख्या नियंत्रित करण्याऐवजी लोकसंख्या वाढीस चालना देणार निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे . खरे तर भारत देशांची लोकसंख्या जरी वाढत असली तरीही सिक्कीम हा राज्य सर्वात कमी लोकसंख्या असणारा राज्य आहे .

सिक्कीम राज्याची एकुण लोकसंख्या फक्त 7 लाख च्या आसपास आहे , यामुळे लोकसंख्या वाढीस चालना मिळावी याकरीता सिक्कीम राज्यांनी हा निर्णय घेतला आहे .सध्या सिक्कीम राज्याचा प्रजननांचा दर हा 1.1 जो कि भारत देशांमध्ये सर्वात कमी आहे .यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे .

शासकीय कर्मचारी , नोकर भरती , शासकीय योजना , राजकिय बातमी / सांस्कृतिक तसेच चालु घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment