Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employee imp shasan nirnay dated 25 November 2024 ] : राज्य विधानसभा निवडणुकाचे निकाल दि.23.11.2024 रोजी लागले आहे , त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी महायुती मार्फत धावपळ सुरु आहे . निवडणुक सुरु असल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारे 02 महत्वपुर्ण निर्णय काल दि.25.11.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .
अ ) वेतनासाठी निधीचे वितरण : विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या 42 पदांच्या मानधनासाठी निधींचे वितरण करणेबाबत , महसुल व वन विभाग माफ्रत दि.25.11.2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदरच्या निर्णयानुसार राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करीता कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या व कार्यरत असलेल्या ..
06 विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व 36 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकुण 42 पदांचे प्रतिमाह रुपये 45,000/- या प्रमाणे माहे ऑक्टोंबर 2024 चे एकुण 18,90,000/- ( अक्षरी – अठरा लाख नव्वद हजार रुपये फक्त ) इतके मानधन अर्थसंकल्प्यि वितरण प्रणालीवर आयुक्त यांच्या मार्फत वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
ब ) अस्थायी पदांना मुदतवाढ : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रम करीता निर्माण करण्यात आलेल्या एकुण 04 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत , राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 25.11.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024