State Employee : मार्च महिन्याचे वेतन आदा करणे संदर्भात महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.12.04.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील वेतन अदा करणे बाबतचा सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहूयात ..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणामुळे माहे मार्च महिन्याचे वेतन अदा करणे बाबत शिक्षण संचालक पुणे यांचे पत्र दिनांक 27 मार्च 2023 रोजीचा संदर्भ देऊन नमूद करण्यात आली आहे की , वित्त विभागाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा रमजान ईद सणामुळे माहे एप्रिल महिन्याचे वेतन ईद-सणापूर्वी अदा करणे बाबत अद्यापि परिपत्रक निर्गमित केलेले नाही .

तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मंजूर अर्थसंकल्पीय निधीपैकी वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर उपलब्ध झालेले अनुदान निधी नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यास शासन निर्णय दिनांक 10 एप्रिल 2023 नुसार मान्यता दिलेली आहे .

त्यानुसार राज्यातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन तात्काळ अदा करण्याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात यावे , यासंदर्भातील राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी श्रीम. रोहिणी किरवे यांच्याकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे . या संदर्भातील दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..

Leave a Comment