केंद्र सरकारकडून नविन शैक्षणिक धोरणास मंजुरी दिल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल नविन शैक्षणिक पॅटर्न लागु करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . नवा शैक्षणिक प्रणालीनुसार शैक्षणिक धोरणांमध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत .नविन शैक्षणिक धोरण हे पुढील वर्षांपासून म्हणजेच जून 2023 पासून लागु करण्यात येणार असल्याची मोठी माहीती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमा दरम्यान दिली आहे .
सध्या राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण हे 10+2+3 म्हणजेच दहावी +बारावी +पदवी असे सध्या धोरण आहे , आता नविन शैक्षणिक धोरणांमध्ये यात बदल करुन 5+3+3+4 असा पॅटर्न राबविण्यात येणार आहे .नविन शैक्षणिक पॅटर्नची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
नविन शेक्षणिक धोरणानांनुसार एकुण चार टप्पे करण्यात आलेले आहेत , यामध्ये पहिला टप्पा विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाच वर्षापर्यंत असून , यामध्ये पहिली व दुसरी वर्गांचा समावेश असणार आहे . सदरचे शिक्षण हे अंगणवाडीमध्येच देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे .
दुसरा टप्पा / तिसरा टप्पा – यामध्ये तिसरी ते पाचवी पर्यंतच्या इयत्तेचा समावेश असणार आहे , तर तिसरा टप्पामध्ये इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता वर्गांचा समावेश असणार आहे .
चौथा टप्पा – यामध्ये इयत्ता नववी ते 12 वी इयत्ता वर्गांचा समावेश असणार असून आता बोर्ड पद्धती रद्द करण्यात आले असून , यामध्ये सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा पद्धतींचा अवलंब या नविन शैक्षणिक धोरणांमध्ये करण्यात आलेला आहे . ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातुन बोर्ड परीक्षेची भिती निघून जाईल , तर यामध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य देखिल विद्यार्थ्यांना मिळणार आहेत .