Breaking News : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात घेतला मोठा निर्णय !

Spread the love

राज्य शासन सेवेतील पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदली करण्यात संदर्भात मोठा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे , या संदर्भात प्रशासनाकडून आदेशही निर्गमित करण्यात आलेला आहे .

एकाच विभागांमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिंदे सरकारने बदलीचे आदेश देण्यात आली आहेत . त्याचबरोबर बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश देखील देण्यात आलेली आहेत . यानुसार दिनांक 17 एप्रिल पर्यंत नवीन ठिकाणी रुजू होण्याची आदेश राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहेत .

यामध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 13 तहसीलदारांच्या बदल्या वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्याचे सहसचिव माधव वीर यांनी आदेश निर्गमित केले आहेत .यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव , मावळ, मुळशी , विल्ला या पाच तालुक्यामधील तहसीलदार / अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे .

त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत तब्बल 132 अभियंते तसेच इतर संवर्ग ‘ब’ व ‘क’ मधील अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत . सदर अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने , राज्य शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . या बदलीमध्ये 132 कनिष्ठ अभियंते , १०९ स्थापत्य पदावरील अधिकारी , विद्युत पदावरील 17 अधिकारी , तर 06 कनिष्ठ अभियंतांचा समावेश आहे .

पुणे जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.अरविंद शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख श्री.नाना भांगरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात पालिकाच्या आयुक्त यांना निवेदन सादर केले होते . यामुळे राज्य शासनाकडून सदर अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदली करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आली आहे .

Leave a Comment