जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या गठित समितीस सादर करावयाचा अहवालाच्या अनुषंगाने , महासंघाची बैठक संपन्न !

Spread the love

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीला द्यावयाच्या प्रस्तावावर महासंघाच्या वतीने दि.11 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण बैठक संपन्न झालेली असून सदर बैठकीमध्ये दि.14 जून 2023 पर्यंत या समितीचा अहवाल जुन्या योजनेप्रमाणे निवृत्तीवेतन मिळण्याच्या तत्वासह शासनाने स्विकारण्याबाबत एकमुखी मागणी करण्यात आलेली आहे .

राज्य शासनांकडून गठित करण्यात आलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीच्या समोर महासंघाच्या वतीने वस्तुनिष्ठ आकडेवारीसह भूमिका मांडून अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी , जुनी पेन्शन योजना व नवि पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन तार्किक व आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मते मांडू संलग्न खाते संघटना त्याचबरोबर जिल्हा समन्वय समित्यांमधील अभ्यासू सहकाऱ्यांची  /प्रतिनिधींची महत्वाची बैठक दि.23 मार्च 2023 च्या सूचने नुसार दि.11.04. 2023 रोजी श्री.विनोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक संपन्न झाली आहे .

या बैठकीत संघटनेचे सरचिटणीस श्री.समीर भाटकर यांनी बैठकीबाबतची पार्श्वभूमी , शासनामार्फत PFRDA यांच्याकडे जमा असलेली रुपये 31,254 कोटी रक्कम त्याचबरोबर मा.मुख्यमंत्री यांनी गुरुवारी दि.06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये निवृत्तीवेतनाबाबत , व्यक्त केलेली सकारात्मकता याची माहिती देण्यात आली . सदर बैठकीत निवृत्तीवेनाबाबत व्यक्त केलेली सकारात्मकता याची माहिती दिल . सदर बैठकीमध्ये अधिकारी संघटनांबरोबरच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनीही जुन्या पेन्शन संदर्भात अभ्यासपुर्ण मांडणी केली .

जुन्या पेन्शन संदर्भात राज्य शासनाने दि.14 मार्च 2023 रोजी समिती गठीत केलेली असून , त्याचा सुधारित शासन निर्णय दि.10 एप्रिल 2023 रोजी शासनातर्फे प्रसारित करण्यात आलेला आहे .या संदर्भात महासंघाच्या वतीने झालेल्या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पीडीएफ डाऊनलोड करण्यासासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

महासंघ समाचार

Leave a Comment