जुनी पेन्शन योजनासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आंदोलनास सुरुवात , जाणून घ्या सविस्तर अपडेट !

Spread the love

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता पुन्हा एकदा राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आंदोलनास सुरुवात झालेली आहे . हे आंदोलन जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने राज्यातील अशंत : अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आजचा आंदोलनाचा सहावा दिवस सुरु आहे , सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अंशत : अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती दि.01 नोव्हेंबर 2023 पुर्वी होवूनही सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली नसल्याने जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरु आहे .या आंदोलनांमध्ये राज्यातील 10 हजारांपेक्षा अधिक शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित आहेत .

हे धरणे आंदोलन माजी आमदार श्रीकांत देशपांडे तसेच माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून या धरणे आंदोलनाची सुरुवात दि.03 मे 2023 पासून सुरु असून आंदोलनाचा आजचा सहावा आहे तरी देखिल कोणताही तोडगा राज्य शासनांकडून काढला जात नाही .यांमध्ये अशंत : अनुदानित / विना अनुदानित शाळांमध्ये दि.01 नोव्हेंबर 2023 पुर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 26,800 एवढी असून सदर कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन करीता न्यायालयांमध्ये लढा सुरु आहे .

हे पण वाचा : महागाई भत्तामध्ये आणखीण 3-4 टक्क्यांनी वाढणार !

राज्य शासनाच्या दि.31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आलेली आहे , परंतु सदर वरील नमुद कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आलेली नाही , यामुळे या आंदोलनाची तिव्रता अधिकच वाढली आहे .

हे आंदोलन अद्याप संपले नसुन राज्यातून आणखीण रोजन 1000 ते 1500 शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनास मुंबई कडे वाटचाल करत आहेत . सध्या न्यायालयांमध्ये सदर शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन ( Old Pension ) करीता याचिका दाखल करण्यात आलेली आहे .

सरकारी कर्मचारी , नोकरी पदभरती , सांस्कृतिक व राजनितिक तसेच इतर घडामोडींच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment