Employee News : कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ( D.A ) 3 – 4 टक्क्यांनी वाढणार , आत्ताची मोठी खुशखबर !

Spread the love

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढी संदर्भात आत्ताची मोठी खूशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे जुलै 2023 मध्ये डी.ए मध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ होणार आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए मध्ये चार टक्क्यांची वाढ प्रत्यक्षात एप्रिल महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्यात आली आहे .

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 मध्ये महागाई भत्तांमध्ये तीन – चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे . कारण नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे . सदर आकडेवारीनुसार महागाई भत्तांमध्ये 3.50 ते 4.10 टक्के वाढ म्हणजेच 4 टक्के वाढ अपेक्षित आहे .सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दर प्रमाणे महागाई भत्ता ( DA ) लागु आहे  .

आता पुन्हा जुलै 2023 पासून चार टक्के वाढ लागु केल्यास , केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ताचा दर हा 46  टक्के पर्यंत जावून पोहोचणार आहे .सदरचा वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा केंद्र शासन सेवेतील 47.58 लाख कर्मचारी त्याचबरोबर 70 लाख पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना अद्याप जानेवारी 2023 मधील डी.ए वाढ लागु करण्यात आलेली नाही , याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून लवकरच जानेवारी 2023 पासून राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना केंद्र सरकार प्रमाणे 42 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात येईल , शिवाय केंद्र सरकारने जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के डी.ए वाढ लागु केल्यास निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के प्रमाणे डी.ए वाढ लागु करण्यात येईल .

सरकारी कर्मचारी , नोकरी पदभरती , सांस्कृतिक व राजनितिक तसेच इतर घडामोडींच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment