Breaking News : राज्‍य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात , विविध कर्मचारी संघटनांची तातडीने बैठकीचे आयोजन !

Spread the love

मराठी पेपर , दिपक पवार प्रतिनिधी : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शनची हमी देण्याचे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत . या साठी राज्य शासनांकडून नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल / शिफारसी सादर करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांची तातडीने सभेचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

जुनी पेन्शन व नविन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या मधील तुलनात्मक अभ्यास करुन शिफारस / अहवाल सादर करण्याकरीता राज्य शासनांकडून अभ्यास समिती स्थापन करण्यात आलेली आहे . सदर समितीस सर्वंकष बाजूचा विचार करुन सर्व घटक संघटना संमत प्रस्ताव समितीस सादर करावयाचा आहे . दि.09 मे 2023 रोजी राज्य शासनांकडून गठित समितीस अहवाल सादर करणेबाबत विचार – विनिमय करुन निर्णय घेणेसाठी विविध संघटनांची तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे DA वाढ करणेबाबत प्रस्ताव तयार !

सदर बैठकीस येताना जुनी पेन्शन व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक विश्लेषण ,आकडेवारीसह प्रस्तावाच्या प्रती तयार करुन सभेसाठी विविध कर्मचारी संघटनांना समिन्वय समिती ,महाराष्ट्र चे निमंत्रक विश्वास काटकर यांनी पाचारण केले आहे .

सदर सरकारी – निमसरकारी , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्राच्या घटक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची सभा गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता , ठाकरसी हाऊस , तिसरा मजला जे.एन हेरेडीया मार्ग बेलाई इस्टेट मुंबई – 400001 येथे आयोजित करण्यात आली आहे .सदर बैठकीस समन्वय समितीच्या घटक संघटनांच्या प्रतिनिधींना वेळेवर उपस्थित राहण्‍याचे आव्हान केले आहेत

Leave a Comment