Good News :  राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.04.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोागाची सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 22 मध्ये संचालक , आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची तरतुद करण्यात आलेली आहे . सदर पदाची शैक्षणिक अर्हता व वेतनविषयक लाभ विद्यापीठ अनुदान आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे व राज्य शासनाने स्वीकृत केल्याप्रमाणे आहेत . विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वेळोवेळी विद्यापीठासाठी मंजूर करण्यात आली असून , त्यानंतर त्यांच्या वेतनाचे आर्थिक दायित्व राज्य शासनाने स्विकारलेले आहेत . त्यानंतर शासन निर्णय दि.18.11.2004 नुसार शासन निर्णयांमध्ये नमुद पदांना शिक्षकीय पदांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती .

सदर पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची शिक्षकीय पदांप्रमाणे वेतनश्रेणी लागू झालेली नाही , विद्यापीठांमध्ये संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभागात कार्यरत असून सदर विभागांमध्ये संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी ही शिक्षक समकक्ष पदे आहेत .

त्यामुळे सदर पदांना शिक्षकीय पदांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यासाठी वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर पदे शिक्षकीय पदांच्या वेतन आयोगाच्या दि.07.10.2009 च्या अधिसूचनेतून शासन अधिसूचना शिक्षकीय पदांप्रमाणे सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे आवश्यक असून सदर प्रस्तावाला दि.05.04.2023 च्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता .

सदर शासन निर्णयानुसार अकृषी विद्यापीठातील आजीवन व विस्तार या विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना शासन निर्णय दि.12.08.2009 व दि.08.03.2019 मधील तरतुदींप्रमाणे अनुक्रमे 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाची (Pay Commission ) सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

यांमध्ये संचालक या पदांकरीता सहाव्या वेतन आयोगांमध्ये 37400-67000/- अशी सुधारणा करण्यात आली तर सातव्या वेतन आयोगानुसार 144,200-2,18,200/- अशी वेतनसुधारणा करण्यात आली .तर संचालक या पदांकरीता सहाव्या वेतन आयांगामध्ये 15600-39100/- अशी तर सातव्या वेतन आयोगांमध्ये 131,400-217,100/- अशी सुधारणा करण्यात आली .

तर प्रकल्प अधिकारी या पदांकरीता सहाव्या वेतन आयोगामध्ये 15600-39100 तर सातव्या वेतन आयोगांमध्ये 57700-182400/-अशी सुधारणा करण्यात आलेली आहे . या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दि.25.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरीता खालील नमुद लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

Leave a Comment