आनंदाची बातमी : संप कालावधी मधील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही , अखेर शासनांकडून शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित करणे बाबत राज्य शासनाच्या सा .प्र.विभागांकडून दि.13.04.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्यातील कर्मचारी / अधिकारी दि.14 मार्च ते दि.20 मार्च असे सात दिवस संपावर होते , या संप कालावधी असाधारण रजा म्हणून घोषित करणेबाबत यापुर्वीच राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता , पंरतु असाधारण रजेमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार होते . यामुळे राज्य शासनांकडून कर्मचारी संघटनांनी दिलेल्या निवेदनांनुसार खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि.14 मार्च  ते 20 मार्च 2023 या कालवधीत पुकारलेल्या संपामध्ये जे कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले होते , त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पुर्वोदाहरण होणार नाही या अटींवर असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .

या संदर्भातील सामान्य प्रशासनांकडून दि.13.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202304131612516907 )डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment