राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना व प्रवास भत्यात किती वाढ करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्यातील लघुवाद न्यायालय , मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बेलिफ कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्यात प्रति महा रुपये 200/- ऐवजी 1500/- रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे . त्याच धर्तीवर कौटुंबिक न्यायालयातील बेलिफ कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरुपी प्रवास भत्यात 200/- रुपये ऐवजी 1500/- अशी सुधारणा करण्याबाबत शासनास विनंती करण्यात आली आहे . यानुसार कौटुंबिक न्यायालयातील बेलिफ कर्मचाऱ्यांना प्रति महा अनुज्ञेय असलेल्या 200/- रुपये इतक्या कामस्वरुपी प्रवास भत्यात 1500/- रुपये अशी सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .
हे पण वाचा : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुरू करण्यात आलेली सरल पगार योजना जाणून घ्या !
यानुसार राज्यातील कौटुंबिक न्यायालयातील बेलिफ कर्मचाऱ्यांना प्रति महा रुपये 1500/- रुपये इतका कायमस्वरुपी प्रवास भत्ता लागू करण्यास शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .सदरचा शासन निर्णय हा दि.01 मते 2023 पासुन प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . याकरीता येणारा खर्च हा न्यायदान , दिवाणी व सत्र न्यायालये प्रमुख न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय या सांकेतांक 2014034101 वोतन या लेखाशिर्षाखाली खर्च टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.28.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर GR डाऊनलोड करण्याकरीता खालील नमुद लिंकवर क्लिक करावे .