राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविणे अशी दोन्ही मागणी राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेली आहे . दि.14 मार्च 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनच्या खालोखाल सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून अभ्यास समिती स्थापन करण्यात आलेली होती . सदर समितीचा अभ्यास सुरु असून , समितीकडून विविध कर्मचारी संघटना व तज्ञांचे मार्गदर्शन मागविण्यात येत आहेत .याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रतिष्ठित मिडिया रिपोर्टमध्ये एका तज्ञांने आपले मत अभ्यास समितीस मांडले आहे .
हे पण वाचा : आता शेतीमालावर मिळणार कर्ज !
या तज्ञांचे असे मत आहे कि , जुनी पेन्शनसाठी सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करणे हा एक उत्तम उपाय असू शकतो , कारण राज्य कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास लगेच सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे लाभांच्या रक्कमेमध्ये 20 टक्के घट होईल .शिवाय याउलट कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षांपर्यंत म्हणजेच 07 वर्षे अधिक काळ कर्मचाऱ्यांना सेवेत रहावे लागेल .ज्यामुळे राज्य सरकारच्या गंगाजळीवरील आर्थिक संकट थोडेसे कमी होईल .
हे पण वाचा : आता राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही मिळणार मानधन तत्वावर नोकरी !
महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी संघटनांकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे कि , जुनी पेन्शन योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसून , 1982-84 ची जुनी पेन्शन योजना जशास तसे राज्य सरकारने लागु करावे अन्यथा राज्य कर्मचारी परत एकदा राज्यव्यापी संप पुकारतील असा इशारा देण्यात आलेला आहे .
शासकीय कर्मचारी , नोकरी भरती , योजना , राजकीय घडामोडी इ.अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा